Dailyhunt आणि AMG मीडिया नेटवर्क्सकडून दिल्लीतील ग्रँड फिनालेमध्ये #StoryForGlory चा समारोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील नंबर 1 स्थानिक भाषा कन्टेन्ट प्लॅटफॉर्म असलेले Dailyhunt आणि अदानी समूहाद्वारे समर्पित असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्स यांच्यातील StoryForGlory या देशव्यापी प्रतिभा शोधाचा नुकताच समारोप झाला. दिल्ली येथे हा भव्य सोहळा पार पडला.  यावेळी देशव्यापी टॅलेंट हंटने व्हिडिओ आणि प्रिंट या 2 श्रेणींतर्गत 12 विजेत्यांची निवड केली.

मे मध्ये सुरू झालेल्या चार महिन्यांच्या कार्यक्रमाला 1000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 20 प्रतिभावान सहभागी निवडले गेले. निवडलेल्या उमेदवारांनी आठ आठवड्यांची फेलोशिप आणि एमआयसीए या आघाडीच्या मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये दोन आठवड्यांचा लर्निंग प्रोग्राम पार पाडला. त्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर सहभागींनी त्यांच्या अंतिम प्रोजेक्ट वर काम करताना सहा आठवडे घालवले आणि आघाडीच्या माध्यम प्रकाशन संस्थांकडून मार्गदर्शनही केले गेले. कार्यक्रमादरम्यान, सहभागींनी त्यांच्या कौशल्य निर्मितीवर आणि त्यांचे कथाकथन आणि सामग्रीची कठोरता वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

अंतिम फेरीत, 20 अंतिम स्पर्धकांनी त्यांचे पोजेक्ट सादर केले, त्यापैकी 12 जणांची सन्माननीय ज्यूरीद्वारे विजेते म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये वीरेंद्र गुप्ता, संस्थापक, डेलीहंट, संजय पुगलिया, सीईओ आणि मुख्य संपादक, एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड… अनंत गोयंका, कार्यकारी संचालक, द इंडियन एक्सप्रेस.. अनुपमा चोप्रा, संस्थापक, फिल्म कंपेनियन, शैली चोप्रा, संस्थापक, SheThePeople; नीलेश मिश्रा, संस्थापक, गाव कनेक्शन आणि पंकज मिश्रा, सह-संस्थापक, फॅक्टर डेली यांचा समावेश आहे .

भारतातील कथाकारांचा प्रतिभावान पूल शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा आम्ही करू शकलो . डिजिटल बातम्या आणि मीडिया स्पेस विशेषत: कथाकथनाच्या कलेमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे आणि #StoryForGlory उपक्रमाद्वारे आम्ही भारताच्या मीडिया इकोसिस्टमला आकार देण्यासाठी आणि भारताच्या नवोदित कथाकारांना त्यांची कौशल्ये विकसित करण्याची तसेच आणि त्यांची आवड शेअर करण्याची संधी देण्यासाठी आमची असलेली वचनबद्धता पुन्हा स्थापित केली आहे. असे डेलीहंटचे संस्थापक वीरेंद्र गुप्ता म्हणाले.

भारत अनेक कथाकारांचे घर आहे. डेलीहंट सह एकत्रितपणे, आम्ही भारतातील इतिहासकारांच्या पुढच्या पिढीला ओळखण्यात आणि त्यांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेले योग्य पाठबळ आणि व्यासपीठ देऊ शकलो आहोत. आम्हाला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त आहे. #StoryforGlory उपक्रम चांगला आशय आणण्यासाठी आणि भारतातील सर्वात प्रतिभावान निर्मात्यांना त्यांच्या सर्जनशील दृष्टीकोनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्ग शोधण्याची आमची सतत असलेली वचनबद्धता प्रतिबिंबित करते असं मत यावेळी AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड चे सीईओ संजय पुगलिया यांनी व्यक्त केलं.