हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी नुकतेच चीन व बौद्ध धर्म याबाबत एक मोठं विधान केलं आहे. “चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाही,” असे दलाई लामा यांनी म्हटलं आहे.
बिहारमधील बोधगया येथे दलाई लामा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, “चीन बौद्ध धर्माला विषारी समजत आहे. धर्म नष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. बौद्ध धर्माचं विहार तोडण्यात आलं. तरीही बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. बौद्ध धर्माला नुकसान पोहचवलं, तरी सुद्धा चीनमधील लोकांची आस्था कमी झाली नाही,” असे दलाई लामा यांनी म्हंटले आहे.
दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली. अशात दलाई लामा यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे.