औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार सध्या बंड पुकारून एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याशिवाय अनेक अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण आहे. अशात आता शिवसेना आमदाराचा (mla udaysingh rajput) लग्नातील डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत (mla udaysingh rajput) डान्स करताना दिसत आहे. उदयसिंग राजपूत यांनी रविवारी एका लग्न समारंभात डीजेवर मै हू डॉन या गाण्यावर ठेका धरला. एकीकडे राज्यात सत्ता नाट्य चालू असताना दुसरीकडे शिवसेना आमदाराने (mla udaysingh rajput) भन्नाट डान्स केला आहे. त्यामुळे या डान्सची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना आमदाराचा लग्नात 'मैं हूँ डॉन' गाण्यावर भन्नाट डान्स pic.twitter.com/IyeNn28KvF
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 27, 2022
दरम्यान कालच उदयसिंग (mla udaysingh rajput) यांनी असा आरोप केला होता, की गटाने मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर होती, असा दावा कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत (mla udaysingh rajput) यांनी केला आहे. तसंच मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्याकडे फॉर्च्युनर कारमधून पैसे आले होते. त्याचे पुरावेदेखील माझ्याकडे आहेत, अदेखील ते म्हणाले होते.
हे पण वाचा :
सत्तेचा तिढा सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी पार पडणार
तिचा संघर्ष : एका फायटीत वातावरण टाईट
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandyaने रचला इतिहास अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच कर्णधार
खळबळजनक!! शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन; राजकीय घडामोडींना वेग