सांगली- कोल्हापूरला महापुराचा धोका; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून अतिवृष्टी आली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरीकांचं स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली असून कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना आणि इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि त्यामुळे सांगलीला पुराचा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. काही गावांमध्ये पाणी शिरले असून लोकांच्या घरातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम पूर पट्ट्यात फिरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.