कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ! अशी घ्या लहान मुलांची काळजी, आयुष मंत्रालयाची नवी गाईडलाईन

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेने वरील ताण थोडासा कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार आणि या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ञ सांगतात. ही लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी यासाठी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शन केले आहे. लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन मध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय सोबत मास्क वापरणं, योग करणं, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे असा असे काही सल्ले देण्यात आले आहेत.

आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईन्स मध्ये म्हटलं आहे की, कोरोना विरुद्धच्या लढाईत आयुर्वेदिक उपचार प्रतिबंधात्मक औषध म्हणून फायदेशीर ठरत आहे. त्यामध्येच लठ्ठपणा, शुगर टाईप एक रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये कोरोनाचा आता अधिक संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस आणण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात करोनाचे येत असलेल्या नवनवीन स्ट्रेंन्स पाहून मुलांसाठी दिलेली गाइडलाइन आणि प्रोटोकॉल फॉलो करणं गरजेच आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांची काळजी घेण्यात जास्त आव्हानात्मक असतं कारण मुलांमध्ये मानसिक रोगप्रतिकारक आणि फिजिओलॉजी यांच्यात भिन्नता आढळून येते.

काय कराल ?
–कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.
— घराबाहेर पडताना मास अवश्य घाला.
— लहान मुलं हात धुण्यास, मास्क घालण्यात टाळाटाळ करत असतील तर त्यांना यामागचं कारण प्रेमानं समजावा.
— पाच ते अठरा वयोगटातील मुलांनी मास्क वापरणे अत्यंत गरजेचा आहे.
— दोन ते पाच या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हा त्यांना ते घाला तसेच त्यांनी मास्क घातल्यानंतर त्यांच्याकडे पालकांनी लक्ष द्या.
— नॉन मेडिकल किंवा तीन लेअर असलेल्या सुती कापडाचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.
— गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नका.
— लहान मुलांना शक्यतो व्हिडिओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.
— जर मुलांमध्ये कोविड संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्यांना घरातील वृद्धांना पासून दूर ठेवा.

लहान मुलांमध्ये आढळून येणारी लक्षणे

सतत चार पाच दिवस ताप येणं, जेवण न जाणं, श्वास घ्यायला त्रास म्हणजे ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी होण, मुलं सतत सुस्तावलेली असणं अशा प्रकारची कोणतीही लक्षणे लहान मुलांमध्ये आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे न्यावे.

अशी घ्या काळजी

— दररोज लहान मुलांना कोमट पाणी प्यायला द्या.
— दोन वर्षांवरील मुलांनी सकाळी व रात्री असं दोन वेळा ब्रश केलं पाहिजे
— पाच वर्षांवरील मुलांची तेलाने मालिश करावी
— मुलांकडून कोमट पाण्याच्या गुळण्या करून घ्याव्यात
— लहान मुलांच्या नाकात दोन थेंब तेल टाकणं,प्राणायाम करणे ध्यान करणे, असा शारीरिक अभ्यास मुलांकडून करून घ्या.

तसेच लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना दररोज हळदीचे दूध, चवनप्राश, आयुर्वेदिक काढे दिले पाहिजेत तसेच मुलांची पुरेशी झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. संतुलित आहार देखील तितकेच गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here