उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा – नाना पटोले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाईल अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत खुद्द नाना पटोले यांनाच विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री पदाबाबत कुठल्याही वाटाघाटी नाहीत – राऊत

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment