हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असून रत्नागिरी , चिपळूण आणि रायगड या ठिकाणी अनेक घरे हि पाण्याखाली गेली असून लोकांचं बचावकार्य सुरु आहे त्यातच आता रायगड येथे दरड कोसळल्याची घटना समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळून ३० घरे दबल्याची शक्यता असून त्याखाली ७१ जण गाडल्याची भीती आहे. पावसामुळे तेथे रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकली नव्हती. पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने एनडीआरएफची टीमही तेथे सहाय्यासाठी जाऊ शकलेली नव्हती. रायगड जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक तडाखा हा महाड, पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना बसला आहे.
दरम्यान, संपूर्ण कोकणात पावसामुळे हाहाकार उडाला असून लोक संकटात आहेत.त्यातच लाईट आणि पाण्याची सोया नसल्याने माणसांचे हाल होत आहेत.रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.