Monday, January 30, 2023

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे.

- Advertisement -

पाटण शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले मोरगिरी गावात अचानक जमीन खचल्याचं दिसून आलं. गेल्या दोन दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. भूस्खलनाने काही ठिकाणी जमीन खचलेल्या आहेत. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेल आहे. लोकांनी गाव सोडून नातेवाईकाकडे राहण्यास गेले आहेत.

आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी प्रचंड घबराट पसरली आहे. किल्ले मोरगिरी येथे भूस्खलन झाल्याने गावातील सर्व यंत्रणा बंद पडलेल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाला माहिती मिळाली नव्हती. लोक नातेवाईकाकडे गेल्यानंतर सदर घटनेची माहिती मिळाली.

गावकऱ्यांनी स्वतः आसरा शोधला
किल्ले मोरगिरी गावात भुस्खलन झाल्याने सर्वच्या सर्व नागरिकांना इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. या घटनेते कोणत्याही प्रकारची जीवीत किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहीती मिळत आहे. मात्र प्रशासनही या भागात मोठ्या प्रमाणावर पाहणी करू शकले नाही. गावातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळण्याआधी बहुतांश ग्रामस्थ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे, मित्रांकडे किंवा इतरत्र आसरा शोधत गाव सोडून निघून गेले आहेत.