ताज हॉटेलमधून 15 लाख लोकांचा डेटा लीक!! हॅकरने मागितली खंडणी

taaj hotel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील ताज हॉटेलवर झालेला 26/11 चा हल्ला आजवर आपण कोणीही विसरलेलो नाही. आता हीच तारीख जवळ आली असताना ताज हॉटेल संदर्भात एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. नुकताच ताज हॉटेलचा सर्व डेटा लीक झाला आहे. सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख लोकांचा डेटा ताज हॉटेलमधून लिक झाला आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहे. सध्या ताज हॉटेल चालवणारी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड या सर्व घटनेचा तपास करीत आहे.

याबाबतची माहिती देत आयएचसीएलने म्हणले आहे की, कंपनी घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करत आहे. हा सर्व डाटा लिंक झाल्यानंतर Dnacookies’ नावाने ट्विटर हँडल चालवणाऱ्या व्यक्तीने कंपनीला 5,000 डॉलरची खंडणी मागितली आहे. मुख्य म्हणजे, लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांचा डेटा, मेंबरशिप आयडी, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. त्यामुळे हा डाटा व्हायरल होणे किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होणे सर्वात घातक ठरू शकते.

दरम्यान, ताज हॉटेलचा डेटा लीक करणार्या हॅकरने दावा केला आहे की, त्याच्याकडे ताजचा 2014 ते 2020 दरम्यानचा सर्व डेटा उपलब्ध आहे. हा डेटा त्याने आत्तापर्यंत कुठेही लीक केलेला नाही. परंतु खंडणीची रक्कम न दिल्यास या डेटाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या डेटा लीक प्रकरणाला आयएचसीएलने गांभीर्याने घेतले आहे. सध्या कंपनी या सर्व दाव्यांची चौकशी करत आहे. तसेच, या संदर्भात तपास करण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.