हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 10 जूनला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या 6 जागा आहेत.
या जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 11, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी 6, बिहारमधून 5 राजस्थान, कर्नाटकमधून 4- 4, ओडिशा-3, बिहार २ मधील ५, हरियाणाच्या २ जागांवर मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. अर्जाची छाननी 1 जून रोजी केली जाईल. तर नावे मागे घेण्याची अंतिम तारीख 3 जून आहे. राज्यसभेच्या जागांसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 2 आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 खासदार सहज निवडून येवू शकतात. तर सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे निवडणूक लढवणार आहेत. संभाजी राजे हे अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सर्वपक्षीयांनी मला पाठिंबा देऊन राज्यसभेत पाठवावे असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.