रात्री ‘या’ कामासाठी बॉयफ्रेंडला बोलवलं घरी; सकाळी समोर आला धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्नाव : वृत्तसंस्था – प्रेमात आणू युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. या वाक्याला साजेसा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये घडला आहे. या मुलीने रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलवून धक्कादायक प्रकार केला आहे. या मुलीने प्रियकराला घरी बोलावून आपल्या आईची हत्या केली आहे. रात्री या प्रियकराने झोपलेल्या मैत्रिणीच्या आईला विटांनी ठार मारलं आणि अंगणात मृतदेह फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता मुलीनं वडिलांना सांगितलं की आईचा मृतदेह रक्तरंजित अवस्थेत अंगणात पडला आहे.तिने शेजारच्यांनाही याची माहिती दिली. जेव्हा मृत महिलेचा पती बाचन घरी पोहोचला आणि पत्नीचा मृतदेह पाहून तो थरथर कापू लागला. मृत महिलेच्या मुली आणि दोन्ही मुलांची चौकशी करण्यात आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृत महिला आणि तिची मुलगी यांचा मोबाइल ताब्यात घेतला आणि त्याचे कॉल डिटेल्स मिळविले. यामध्ये या मुलीने शेजारचा रहिवासी असलेल्या सलमानशी संभाषण केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ही हत्या केल्याचं कबूल केले आहे.

आरोपी सलमानने पोलिसांना सांगितलं की मृताच्या मुलीशी त्याचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.10 दिवसांपूर्वी मुलीच्या आईनं मुलीला धमकावलं होतं की ती सलमानला भेटली तर ती सलमानला ठार करील.यानंतर मुलीने आईला जिवे मारण्याचा कट रचला आणि बुधवारी रात्री एक वाजता सलमानला घरी बोलावले. आरोपीने सांगितले की त्याने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने खाट्यावर झोपलेल्या महिलेवर हल्ला केला. जेव्हा तिने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ओढत अंगणात नेले आणि तिच्या डोक्यावर विटांनी वार करुन तिला ठार केले.

Leave a Comment