Delhi Capitals ला मिळाला नवा कर्णधार; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार नेतृत्त्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल ला (IPL 2023) अवघा महिना बाकी आहे. सर्व संघांकडून आपापली रणनीती आखली जात आहे. त्यातच आता दिल्ली कपिटल्सने आपला कर्णधार बदलला आहे. मागील वर्षी ऋषभ पंतने दिल्लीची कमान सांभाळली होती मात्र अपघातामुळे पंत आयपीएल बाहेर असल्याने त्याच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकी ग्रुपच्या एका सदस्याने क्रिकबझला सांगितले की डेव्हिड वॉर्नर आमचा कर्णधार असेल, तर उपकर्णधारपदी स्टार अष्टपैलू अक्षर पटेल राहील. विशेष म्हणजे, वॉर्नर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता, त्याने 2016 मध्ये SRHला चॅम्पियन सुद्धा बनवले होते. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा दिल्लीच्या संघाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्लीच्या संघातूनच केली होती. त्यांनतर काही वर्ष तो सनरायझर्स हैदराबाद संघात होता. वॉर्नर हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत गणला जातो. त्याने आत्तापर्यंत 162 आयपीएल सामन्यांमध्ये 5881 धावा नोंदवल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे.