हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता खासगी क्षेत्रातील DBS Bank ने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू
DBS Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 1 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. या बदलानंतर, बँकेकडून सर्वसामान्यांसाठी 2.50 ते 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.25 टक्के ते 7.00 टक्के व्याजदर दिला जातो आहे. DBS Bank आता एफडीवर सर्वसामान्यांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.
DBS Bank चे नवीन व्याजदर- (सामान्य नागरिकांसाठी)
DBS Bank आता 7 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के, 8 दिवस ते 60 दिवसांपर्यंतच्या FD वर 2.75 टक्के, 61 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के, 62 दिवस आणि 180 दिवसांपर्यंतच्या FD वर 3.00 टक्के, 181 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.75 टक्के, 365 दिवस ते एक वर्षाच्या च्या FD वर आता 6.25 टक्के दराने व्याज मिळेल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dbs.com/digibank/in/deposit/fixed-deposit/interest-rates.page
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर