Wednesday, March 29, 2023

शिखर धवनने आपल्या नावे केला ‘हा’ मोठा विक्रम;आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच सलामीवीर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये रोज नवनवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर होत आहेत. असाच एक विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. काल मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला होता . या सामन्यात शिखर धवन याने ४५ धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली होती.

शिखर धवनने ४५ धावांच्या आपल्या खेळीत सलामी फलंदाज म्हणून ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच त्याने यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅपसुद्धा आपल्या नावावर केली आहे जी सर्वात जास्त रन्स करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. आयपीएलच्या इतिहासात सलामीवीर म्हणून ५००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अजूनपर्यंत कोणत्याच सलामवीराला अशी कामगिरी करता आलेली नाही.

- Advertisement -

शिखर धवन आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांकडून खेळला आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसऱ्या स्थानी आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ४६९२ धावा आहेत. पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल तिसऱ्या स्थानी आहे त्याच्या नावावर ४४८० धावा आहेत. धवनचा हा रेकॉर्ड मोडणे यंदाच्या आयपीएलमध्ये तरी अशक्य दिसत आहे.