आता DCB Bank च्या FD वर ग्राहकांना मिळणार जास्त व्याज, असे असतील नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DCB Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

DCB Bank buys office space in Mumbai's Lower Parel for ₹37 crore | Mint

17 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

मात्र, DCB Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. 17 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. बँकेने व्याजदरात 40 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. बँक आता 700 दिवस ते 60 महिन्यांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.50% व्याज देईल. 7 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 3.75% व्याज दिले जाईल. DCB Bank ग्राहकांना 91 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.50% व्याज देईल. 6 महिने ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील 5.70% व्याजदर असेल आणि 12 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर वार्षिक 6.10 टक्के व्याज मिळेल.

DCB Bank - Getting Back On Track: Axis Securities

DCB Bank चे नवीन व्याज दर

बँक आता 15 महिने ते 700 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75% दराने व्याज देईल. त्याचप्रमाणे, ग्राहकांना 700 दिवसांच्या FD वर 7.10% व्याज मिळेल. बँकेने 700 दिवसांपेक्षा जास्त मात्र 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याज 40 बेसिस पॉईंट्सनी वाढवून वार्षिक 7.50% केले आहे.

DCB Bank ने फिक्‍स्‍ड डिपॉझिटवरील व्याजदर 36 महिन्यांवरून 60 महिन्यांपर्यंत 25 बेसिस पॉईंट्सनी वाढवला आहे. पूर्वी बँक 7 टक्के व्याज देत होती, आता 7.25% दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 60 महिने ते 120 महिन्यांच्या FD वर मिळणाऱ्या व्याजात कोणताही बदल होणार नाही आणि बँक पूर्वीप्रमाणेच त्यावर 7.00% व्याज देत राहील.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर