दादा भुसेंशी जवळीक असणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची ठाकरे गटाने केली हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या राजकारणातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाशी जवळीक ओळखून पक्षाला सोडचिठ्ठी करण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकाची हकालपट्टी केली आहे. श्याम साबळे (Shyam Sable) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. नाशिकमधील अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे पाहून इतरांना धक्का देण्याची तयारी ठाकरे सुरु केली आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक श्याम साबळे (Shyam Sable) यांची ठाकरे गटाने हकालपट्टी केल्याने नाशिकमधील शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. श्याम साबळे (Shyam Sable) यांच्या हकालपट्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

यानंतर प्रवीण तिदमे हे दहा ते बारा माजी नगरसेवक शिंदे गटात सामील करणार असल्याचे समोर आले होते त्यामध्ये श्याम साबळे (Shyam Sable) यांचाही समावेश असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपल्याला सुरुंग लावण्याआधीच हकालपट्टीची कारवाई करत सर्वांना धक्का दिला आहे. या हकालपट्टीची घोषणा ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!