DCB Bank कडून ‘या’ स्पेशल एफडीवर मिळेल 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DCB Bank ने रिटेल ग्राहकांना स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.50 % व्याज दर देऊ केला आहे. या डिपॉझिट योजनेचा कालावधी 700 दिवसांपासून ते 36 महिन्यांपर्यंत असेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 8.25% पर्यंत व्याज मिळेल.

DCB Bank Q1 Review - Sticks To Growth Targets, Investing Heavily In Supporting Infra: Nirmal Bang

‘या’ बँका FD वर देत आहेत 7% पेक्षा जास्त व्याज

सध्या, कॅथोलिक सीरियन, बँक ऑफ इंडिया, आरबीएल बँक आणि सिटी युनियन बँक यासह इतर बँका स्पेशल फिक्स्ड डिपॉझिटवर 7.50%, 7.25%, 7.25% आणि 7.1% व्याज देत आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50%, 7.75% पर्यंत व्याज मिळू शकते. मात्र, या एफडीच्या व्याजदराचा कालावधी प्रत्येक बँकेनुसार बदलतो. DCB Bank

स्पेशल एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज मिळू शकते. यामध्ये कॅनरा बँक (666 दिवसांची मुदत), बंधन बँक (600 दिवसांची मुदत), फेडरल बँक (700 दिवसांची मुदत), IDFC फर्स्ट बँक (700 दिवसांची मुदत), पंजाब नॅशनल बँक (600 दिवसांची मुदत), पंजाब अँड सिंध बँक (601 दिवसांची मुदत) आणि युनियन बँक (599 दिवसांची मुदत) यांचा स्पेशल एफडीचा समावेश आहे. DCB Bank

DCB Bank hikes interest rates on savings accounts: Details inside | Mint

FD वर व्याजदर 8% पर्यंत जाऊ शकतो

एका मीडियाच्या बातमीनुसार, Bankbazaar.com चे मुख्य व्यवसाय अधिकारी पंकज बन्सल म्हणतात, “महागाई अजूनही उच्च स्तरावर आहे आणि जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांकडून व्याजदरात वाढ होत आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यांत एफडीचे दर वाढतच राहतील. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांकडून जास्त रिटर्न असलेल्या स्पेशल मुदतीच्या FD ऑफर केल्या जातात. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, येतंय काही महिन्यांत व्याज दर 8% पर्यंत जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे.” DCB Bank

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. DCB Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dcbbank.com/dcb-fixed-deposits/deposit-rates

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा