नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह आठ दिवसांनी सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी

 गेल्या सोमवारी सांगलीच्या कृष्णा नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह तब्बल ८ दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर हरीपूरच्या कृष्णा-वारणा संगमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडला. ऐश्वर्या राजू खोत असे त्या तरुणीचे नाव आहे. गेल्या सोमवारी ऐश्वर्या खोत या तरुणीने सांगलीच्या आयर्विन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारली होती. उडी मारण्यापूर्वी तिने आपला मोबाईल तेथील लोखंडी पाइपवर ठेवला होता.

याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. तिने उडी मारल्यानंतर नदीत पाणी अधिक असल्याने तिची बॉडी धरणाजवळ अडकली होती. पाणी कमी झाल्यानंतर बॉडी तेथून वाहत जाऊन हरीपूरच्या दिशेने गेली. आज दुपारच्या सुमारास काही मच्छीमारांना प्रेत दिसल्यानंतर रेस्क्यू टीम व पोलिसाना याची माहिती देण्यात आल्यानंतर सर्वजण तात्काळ उपस्थित झाले. बघ्यांची गर्दी जमली.

महापालिकेचे विजय पवार, सतीश वाघमारे, सांगली ग्रामीणचे वंजारी, पी.एच.पाटील, सांगली शहरचे निवास कांबळे यांच्यासह स्पेशल रेस्क्यू टीम चे आनंद आठवले, राजू कांबळे, कैलास वडर, राजू मोरे, स्वप्नील धुमाळ, अंकुश घोरपडे, मयूर बिराजदार आणि महेश गव्हाणे यांनी शोधकार्य सुरू केले. त्यांना हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऐश्वर्याचा मृतदेह दिसला. तो घाटावर आणण्यात आला. यावेळी तिच्या कुटुंबिय उपस्थित होते. त्यांनी मृतदेह ओळखला. तिच्या मृतदेहाचे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.