अवैध रित्या मुरूम उत्खनन केलेल्या पाण्याचा डबक्यात मुलाचा मृत्यू

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मौजे साकुर्डी गावातील बारा वर्षाच्या मुज्जफसर समीर मुलाणी याचा अवैध रित्या मुरूम उत्खनन केलेल्या पाण्याचा डबक्यात पडुन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे मौजे साकुर्डी गाव परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कराड तालुक्यातील साकुर्डी गावचे नागरिक असलेल्या समीर मुलाणी यांचा मुलगा मुज्जफसर व त्याचे मित्र शनिवारी दुपारी पाळीव कुत्र्याला घेऊन गावच्या उत्तरेला असणाऱ्या पिरसाहेब टेकडीकडे गेले होते. त्या परिसरातील नवीन दफनभुमीच्या दरम्यान अवैध रित्या उत्खनन केलेल्या मुरुमाने पडलेल्या मोठ्या डबक्यात पावसाचे पाणी साचले होते. त्या डबक्यात त्याचा कुत्रा पडल्याने त्याला वाचविण्यासाठी मुज्जफसर त्या डबक्यात गेला. त्यावेळी डबक्यातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

मुज्जफसर पाण्याच्या डबक्यात बुडत असल्याचे पाहता त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला. आरडाओरड परिसरात असलेल्या गुराखीच्या कानावर गेली. त्या गुराखीने त्या ठिकाणी तत्काळ धाव घेतली. तसेच त्या डबक्यात पडलेल्या एका मुलाला पाण्याबाहेर काढले. मात्र त्या डबक्यात असलेला मुज्जफसर पाण्याचा डबके मोठे असल्याने त्यात बुडाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या कानावर पडताच त्या ठिकाणी लोक जमा झाले. त्यांनी मुज्जफसरचा डबक्यात शोध घेतला. व त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here