Monday, January 30, 2023

डोक्यात दगड पडून अल्पवयीन कामगाराचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी केला होता ब्लास्ट

- Advertisement -

औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी ब्लास्ट केल्यानंतर डोंगराला जोरदार हादरे बसले. या ब्लास्टनंतर दोन तासांनी डोंगरावरील दगड निखळून कामगाराच्या डोक्यात पडला. यात अल्पवयीन कामगार जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी जटवाडा परिसरात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर घडली.

मुस्‍तकीम ऊर्फ राजू कयूम पटेल (वय 17) रा.जटवाडा असे मृत अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. तो आई-वडील बहीण आणि भावासह राहतो. मुंबई – नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मुख्य ठेकेदार कंपनीने सब ठेकेदार नेमके असून येथे स्थानिक आणि परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. जटवाडा परिसरात समृद्धी महामार्गाचे काम मेघना कन्स्ट्रक्शन कंपनी ही करते. मुस्‍तकीम हा त्याच्य कंपनी अंतर्गत काम करतो. त्याच्याकडे लेव्हलिंगचे मोजमाप करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. गुरुवारी सकाळी नेहमी प्रमाणे तो कामावर हजर झाला. डोंगराच्या बाजूलाच लेव्हलिंग करण्याचे काम सुरू असल्याने तो तेथेच उभा होता. दरम्यान, डोंगर पोखरण यासाठी ब्लास्ट करण्यात आला.

- Advertisement -

त्यानंतर अंदाजे दोन तासांनी डोंगरावरील एक दगड निखळला आणि तो मुस्‍तकीमच्या डोक्यात पडला. डोंगरावरून आलेला दगड मोठा होता. त्यामुळे मुस्‍तकीम जागीच ठार झाला माहिती मिळाल्यावर हर्सूल आणि दौलताबाद पोलिस घटनास्थळी गेले. या घटनेची नोंद हारसुल ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक अतुलकुमार कोठळ करीत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर साइट इन्चार्ज सुब्बा रेड्डी आणि भांडारपाल मेडपल्ली हे घटनास्थळी गेले. संतप्त नातेवाईक व मजुरांनी या दोघांना बेदम मारहाण केली. यात रेड्डी जखमी झाली. त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.