हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अवचट यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती या अवचट यांच्यामध्ये होत्या.
1969 साली अवचट यांचे पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केकरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
डॉ. अनिल अवचट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. अवचट यांनी साहित्यिक विश्वात आपले योगदान दिले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय,असा मोठा मित्रपरिवार आहे.