सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 726 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 3 हजार 632 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 973 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 34 हजार 997 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 7 हजार 904 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3105 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी दिवसभरात 44 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीतील निर्बंध 1 जून पर्यंत वाढविले ः जिल्हाधिकारी
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोख्याण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध दिनांक 1 जून रोजी सकाळी 7.00 वा. पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba