आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते कन्नड तालुक्यात रस्त्याचे लोकार्पण

औरंगाबाद | जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आमदार अंबादास दानवे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०१९ -२० अंतर्गत विटखेडा ते कन्नड ग्रामीण मार्ग २०४ या रस्त्याचे लोकार्पण विटखेडा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्ता कामाबाबत संबंधितांना मार्गदर्शक सूचना यावेळी दानवे यांच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, उपतालुकाप्रमुख संजय मोटे, विभाग प्रमुख दीपक बोडखे, पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रस्त्याच्या कामासाठी आमदार अंबादास दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच माजी उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर रावते, विटखेडाचे संरपंच गोरख रावते, अरूण सोनवणे, आकाश उबाले, जयदीप वेताळ, रवी बडोगे, गणेश सवई, विकास नांगुडै, अनिल करंगळी, अनंता पवार, चांगदेव सावडे, अनिल गोल्हारेसह परिसरातील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like