पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्याचा शिवसेनेला पाठिंबा; शेकाप अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सांगोला आणि सोलापूरमधील इतर भागात राष्ट्रवादी पक्षाचं खच्चीकरण करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाऐवजी शिवसेनेला मदत करायला हवी या मताने राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या नेत्याने अशी घोषणा जाहीरपणे केल्यामुळे स्थानिक शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.