राज साहेब, लवकर बरे व्हा, नाहीतर फडणवीस एकटे पडतील

0
83
deepali sayed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद सातत्याने भाजपवर टीका करत असतात. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज साहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला.

माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील, असं दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच “भोंगा अजून अर्धवट आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत. त्याच पार्श्वभूमी वर दीपाली सय्यद यांनी खोचक ट्विट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here