संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरासाठी दीपिका साकारणार डाकू रुपमती

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या हटके आणि अनोख्या ढंगासाठी ओळखले जातात. अवाढव्य सेट, त्यातील सुंदर कल्पकता, त्याची मांडणी आणि भव्य सादरीकरण यामुळे त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी खास पर्वणी असतात. एकंदर त्यांचा एकदम रॉयल कारभार असतो. प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण ही त्यांच्या ठरलेल्या कलाकारांपैकी एक आहे. तिने भन्साळींसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बाजीराव मस्तानीमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता भन्साळींच्या नव्या चित्रपटात तिचा वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/CM_5CcZDRoX/?utm_medium=copy_link

मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी हे त्यांच्या आगामी बैजू बावरा चित्रपटासाठी दीपिकाला साईन करणार आहेत. यात ती मुख्य भूमिकेत असून ती डाकू रुपमतीची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. भन्साळीनी अद्याप तिला ती भूमिका द्यायची आहे. पण भन्साळी आणि दीपिका यांच्या स्ट्राँग बाँडिंगविषयी सर्वांनाच माहित आहे. यापूर्वी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दीपिकाने अत्यंत महत्वाच्या आणि उठावदार भूमिका वाठविल्या आहेत. पद्मावती महाराणीच्या भूमिकेनंतर दीपिका प्रथमच एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिची ही भूमिका निश्चितच तिच्या चाहत्यांसाठी देखील खास ठरणार आहे.रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दीपिकाने महत्वाच्या भूमिका अगदी जबाबदारीनिशी शंभर टक्के अव्वल साकारल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CI8lLPrnzCr/?utm_medium=copy_link

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार भन्साळींच्या बैजू बावरा चित्रपटात दीपिका ही मुख्य भूमिकेत असणार आहे. ती डाकू रुपमतीची भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबत संजय भन्साळी यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भन्साळी आणि दीपिका यांची या चित्रपटा संदर्भातील बोलणे पूर्ण झाले आहे.

https://www.instagram.com/p/CLrUS-Ghk4k/?utm_medium=copy_link

काही दिवसांपूर्वी दीपिका आणि भन्साळी यांच्यात वाद निर्माण झाला आहे, अश्या बातम्या जोरदार पसरल्या होत्या. मात्र ह्या बातमीनंतर त्यांचे वाद मिटले असल्याची शक्यता आहे. सध्या भन्साळी त्यांच्या गंगूबाई काठियावाडीच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अत्यंत व्यस्त आहेत. त्या चित्रपटामध्ये दीपिकाने एक आयटम साँग केले आहे. त्याचबरोबर भन्साळी यांनी तिला त्यांच्या हिरा मंडी या वेबसीरिजसाठीही ऑफर दिली होती. मात्र दीपिकाने ती रिजेक्ट केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here