Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईसमोर मोठे स्टार्सही फिके, अभिनेत्रींकडे आहे इतक्या कोटींची मालमत्ता

Deepika Padukone
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Deepika Padukone Net Worth : बॉलीवूडचा किंग खान असलेल्या शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या बहुचर्चित चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी दीपिका पदुकोण आज 37 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्क येथील कोपनहेगनमध्ये जन्मलेली दीपिका फक्त चित्रपटच नाही तर कमाईच्या बाबतीतही पुढे असल्याचे दिसून येते. तसेच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाच्या नावाचाही समावेश होतो. चित्रपटांबरोबरच ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट निर्मिती आणि अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करूनही तिला भरपूर कमाई होते. चला तर मग आजच्या या बातमीमध्ये आपण दीपिकाच्या एकूण संपत्ती विषयीची माहिती जाणून घेउयात…

Watch: Deepika Padukone cuts birthday cake at the airport with Ranveer  Singh and her fan - IBTimes India

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये घेते. दीपिका बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त, सोशल मीडियावरील आपल्या फोटोंद्वारेही तिला भरपूर कमाई मिळते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही ब्रँडची जाहिरात करण्यासाठी किंवा इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ती सुमारे 1.5 कोटी रुपये घेते. Deepika Padukone Net Worth

Deepika Padukone - Bio, Age, Height, Net Worth - AFLENCE

इतकी आहे संपत्ती

मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या दीपिकाची एकूण संपत्ती सुमारे $40 लाख किंवा 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2006 मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटाद्वारे आपला चित्रपट प्रवास सुरू करणाऱ्या दीपिकाने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ द्वारे बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री केली.

दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट जबरदस्त हिट ठरला ज्यानंतर तिचा समावेश बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये झाला. यानंतर दीपिकाने ‘बाजीराव मस्तानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘ये जवानी है दिवानी’ सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देत बॉलिवूड मधील आपले स्थान पक्के केले. याशिवाय दीपिकाने विन डिझेलसोबत XXX: Return of Xander Cage American या हॉलिवूड चित्रपटामध्येही काम केले आहे. Deepika Padukone Net Worth

Deepika Padukone Net Worth 2022: Salary, Assets, Income, Forbes, Biography

संपत्तीमध्ये झाली वर्षागणिक वाढ

काही मीडिया रिपोर्ट्सवर नजर टाकल्यास याद्वारे असे कळते कि, दीपिकाच्या संपत्तीमध्ये वर्षागणिक वाढच होते आहे. 2018 मध्ये 113 कोटी रुपये असलेली संपत्ती 2019 मध्ये वाढून सुमारे 150 कोटी रुपये झाली. यानंतर 2020 पर्यंत तो आकडा 198 कोटी वर पोहोचला. 2021 मध्ये, तर दीपिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होऊन ती सुमारे 225 कोटी रुपयांवर आली. एका ताज्या आकडेवारीनुसार तिच्याकडे 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे दिसून येते आहे.

अभिनयाबरोबरच दीपिका प्रॉडक्शन हाऊसमधूनही कमाई करते. तिने आतापर्यन्त ‘छपाक’ आणि ’83’ सारख्या दोन बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र तिचे हे दोन्ही चित्रपट तिकीट खिडकीवर काही खास कामगिरी करू शकलेले नाहीत. हे लक्षात घ्या कि, 2018 सालच्या फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीलाही स्थान देण्यात आले होते जी दीपिका पदुकोण होती. 2018 मध्ये तिने एकूण 112.8 कोटी रुपयांची कमाई करत या लिस्टमध्ये चौथे स्थान पटकावले. Deepika Padukone Net Worth

Deepika Padukone Age, Height, Weight, Size, DOB, Husband, Family, Biography  - News Resolution

ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून होणारी कमाई

दीपिकाने मिंत्रा, तनिष्क, टेटली ग्रीन टी आणि लॉरेल यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसा मिळवला आहे. लॅव्हिश लाईफस्टाईल जगणाऱ्या दीपिकाचे मुंबईत दोन आलिशान फ्लॅट देखील आहेत. त्याचप्रमाणे या अभिनेत्रीकडे ऑडी, मर्सिडीज आणि रंग रोव्हरसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. Deepika Padukone Net Worth

Deepika Padukone Net Worth | Celebrity Net Worth

गुंतवणूकीद्वारे मिळालेला नफा

दीपिकाने Furlenco, Purple, Bluesmart, Epigamia, Bellatrix Aerospace आणि Frontero यां कंपन्यांमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. त्यापैकी, Furlenco हे फर्निचर भाड्याने देणारे प्लॅटफॉर्म आहे, तर Purple हे सौंदर्य प्रसाधने आणि स्किन केअर प्रोडक्ट विकणारे ऑनलाइन स्टोअर आहे.

तर Epigamia हा प्रिमियम ऑल-नॅच्युरल ग्रीक योगर्ट ब्रँड आहे आणि Bellatrix Aerospace ही एक स्मॉल सॅटेलाईट कंपनी आहे. त्याचप्रमाणे Frontero हे 2020 मध्ये लाँच करण्यात आलेले एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. Bluesmart ही दिल्ली-NCR मधील कॅब सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे. दीपिकाने यामध्ये सुमारे 3 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी ड्रम्स फूड आणि स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप एरोस्पेसमध्येही पैसे गुंतवले आहेत. Deepika Padukone Net Worth

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.forbesindia.com/celebprofile2019/deepika-padukone/1819/19

हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या