दिल्लीत २४ तासात १४१ कोरोना पोझिटिव्ह, १२९ जण निजामुद्दीन मरकज येथील उपस्थितांपैकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १८६० वर पोहोचला आहे. एकट्या दिल्लीत आज तब्बल १४१ नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. विषेश म्हणजे दिल्लीत सापडलेल्या १४१ रुग्णांपैकी १२९ जण निजामुद्दीन मरकज मधील कार्यक्रमात उपस्थित असल्याचे समजत आहे.

दिल्लीतील एकुण कोरोना बाधितांचा आकडा आता २९३ वर पोहोचला आहे. यामधील १८२ जण निजामुद्दीन मरकज येथील कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच दिल्लीत आत्तापर्यंत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी २ जण निजामुद्दीन मरकज येथे उपस्थितांपैकी आहेत.

दरम्यान, निजामुद्दीन मरकज येथे उपस्थित असणार्‍या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे दिल्लीत एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली आहे. दिल्ली सरकार मरकज च्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४१६ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कराडचा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू सीओंवरच उलटला

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता