दिल्ली निवडणूक2020: मागील वेळेपेक्षा जवळपास 10% कमी मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आज सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. दुपार 3 वाजेपर्यंत दिल्लीत केवळ  41.5 टक्के मतदान झाले आहे. 2015 मध्ये इतक्याच वाजेपर्यंत 51.2 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. दोन्हींची तुलना करता मागच्या मतदानाच्या आकडेवारीत 10 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, मतदानात झालेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीचा फटका कोणत्याही एका पक्षाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. आज सकाळी 11.30 पर्यंत 16.36% लोकांनी मतदान केले आहे. मतदानासाठी आज सुरक्षा व्यवस्थेची जोरदार बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस 66 आणि भाजप 67 जागा लढवत आहेत. भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 3 जागा सोडल्या आहेत. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार वगळता यावेळी 148 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment