अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाचा दणका; 5Gविरोधातील याचिका फेटाळत 20 लाखांचा केला दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशन विरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. याबाबत नागरिकांमध्ये कोणतीही जागरूकता नाही हे पाहता तिने यावेळी थेट न्यायालयाचे दार ठोठावले होते. जुहीने भारतात 5G तंत्रज्ञान लागू करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचे मुद्दे तिने योग्यरीत्या मांडण्याचा प्रयत्नही केला. मात्र 5G विरोधातील ही याचिका दिल्ली हायकोर्टाकदम फेटाळण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ही याचिका जुहिने केवळ पब्लिसीटी स्टंटसाठी दाखल केली असल्याचे सांगत तील कोर्टाने तब्बल 20 लाख रुपयांचा कठोर दंड ठोठावला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्या म्हटले की, अभिनेत्रीच्या याचिकेत फक्त काहीच गोष्टी योग्य आहेत. बाकी सर्व तर्क वितर्क लावण्यात आले आहेत आणि विविध शंका उपस्थित करीत विषयाला फाटे फोडण्यात आले आहेत. यासोबतच जुहीच्या वकिलालाही आदेश दिले की, या प्रकरणात न्यायालयातील नियमांसह जे न्यायालयाचे शुल्क आहे ते देखील न्यायालयात त्वरित जमा करावे. कारण केस दाखल करताना जमा केलेली न्यायालयाची फी नियमानुसार अत्यंत कमी होती.

https://twitter.com/Mirza_jaanmj/status/1400817549336481799?s=20

दरम्यान न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा चुकीचा वापर केला आहे. सुनावणी दरम्यान जुहीच्या कुण्या चाहत्याने न्यायालयातच तिच्या गाण्याचा सूर धरला होता. यावरही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आदेश दिला आहे की, न्यायालयाच्या मागील सुनावणी दरम्यान मोठ-मोठ्या आवाजात गाणे म्हणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जावी. त्यामुळे आता जुहीच्या चाहत्याला सुद्धा चांगलाच धडा मिळणार आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा योग्य आणि वेळेवर काळजी घेणे नेहमी फायद्याचे ठरते. मानवता आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्वरित ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि यासंदर्भातच मी संबंधित अधिकाऱ्यांना मला योग्य माहिती दाखवायला सांगत आहे.

एप्रिल २०१९ मध्ये आयसीएमआरने आमच्या आरटीआय अर्जाला दिलेले उत्तर सोबत जोडत आहे. 5G सूट विषयी : माननीय कोर्टाकडून या विषयी अभ्यास करून अहवाल प्रकाशित करावा तसेच आम्हाला आणि जनतेला 5G तंत्रज्ञान हे सुरक्षित आहे या विधायि माहिती द्यावी, या पार्श्ववभूमीवर जूहिने हा खटला दाखल करण्यात आला आहे असे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी जुहीने 5G तंत्रज्ञान भारतात लागू करण्याविषयी विरोध करीत कोर्टात याचिका दाखल केली होती. यात तिने म्हंटले होते की, आम्ही 5G विरुद्ध नाही. माननीय दिली उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा हा 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून आम्ही त्याचे समर्थन करतो. परंतु आम्हाला सरकारकडून तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याविषयी पुरावा हवा आहे की 5G तंत्रज्ञान हे वनस्पती, प्राणी तसेच मनुष्य जातीसाठी पूर्णतः सुरक्षित आहे.

Leave a Comment