तक्रारदार महिलेच्या हातावरील ‘टॅटू’ पाहून बलात्काराच्या आरोपीला कोर्टाने दिला जामीन; पण का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयात एक कमालीची घटना घडली आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला केवळ तक्रारदार महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू कोरलेला असल्याचे पाहून जामीन दिला. पीडित महिलेने आरोपीने आपल्या हातावर जबरदस्तीने आपले नाव गोंदवले होते असा दावा केला होता.

मात्र, यावर हायकोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवताना सांगितले की, अशा प्रकारचे टॅटू गोंदवणे हे सामान्य काम नाही. न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी सांगितले की, ”माझ्या मते असे टॅटू गोंदवणे ही एक कला आहे. त्यासाठी एका विशिष्ट्य मशीनची आवश्यकता असते. त्याशिवाय, फिर्यादीच्या हातावर आहेत तशा प्रकारचे टॅटू कोरणे हे सोपे काम नाही.”

नेमकं प्रकरण आहे काय?
एका महिलेने एकाने आपल्यावर लैगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपीने धमकी देऊन ब्लॅकमेल करून आपल्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले होते. हे शरीरसंबंध २०१६ ते २०१९ दरम्यान सुरू होते, असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. तक्रारदार महिला ही विवाहित होती. ती माझ्यावर प्रेम करायची. तसेच आपण नात्यात असल्याचा दावा करायची असं तर आरोपीचे म्हणणं आहे. आरोपीने आपली बाजू मांडताना महिलेच्या हातावर गोंदवलेल्या टॅटूचे फोटोही दाखवले. तसेच या महिलेने आपल्यासोबत अनेक टॅटूही काढले होते असे सांगितले. आमची मैत्री फेसबूकच्या माध्यमातून झाली होती, मी तिला फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली होती, असे सांगितले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.