राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि …; रामदास आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषण शैली आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय.

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींना हा मोलाचा सल्ला दिलाय.

दरम्यान, मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. मराठा आरक्षण ओबीसीमध्ये टाकून वाद निर्माण करू नये. 2021 ची जनगणना जातीच्या आधारावर करावी ही पंतप्रधानकडे मागणी केलीय. त्यामुळे जातीनिहाय आकडेवारी कळायला मदत होईल, असंही रामदास आठवले म्हणालेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like