चोरी करा, भीक मागा,पण ऑक्सिजन पुरवा ; कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टाने मोदी सरकारला फटकारले आहे . कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना पाहू शकत नाही, अशा परखड शब्दात हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले.

यावेळी न्यायालयाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या खासगी कंपन्यांनावर देखील ताशेरे ओढले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 21.5 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशावेळी पर्याप्त ऑक्सिजनचा साठा असणे गरजेचे आहे. खासगी कंपन्यांना एवढी हाव सुटली आहे का, त्यांना साधी माणुसकीही दिसत नाही, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने विचारला.

टाटा स्टीलने आपल्या प्रकल्पांमध्ये तयार होणारा पूर्ण ऑक्सिजन वैद्यकीय सेवांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मग दुसऱ्या खासगी कंपन्या असे का करु शकत नाहीत? त्यांच्यासाठी माणुसकीची काहीच किंमत नाही का?  असा सवाल देखील कोर्टाने केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.