हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी देशातील सर्वात मोठा महत्वाकांशी प्रोजेक्ट म्हणजेच “दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे ” (Delhi Mumbai Expressway) मधील दिल्ली ते वडोदरा दरम्यानच्या एक्सप्रेसवेच्या रस्त्याचे लोकार्पण केले आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते वडोदरा या दोन महत्वपूर्ण शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होऊन अवघ्या 10 तासांवर येणार आहे.
18 तासांचा प्रवास केवळ 10 तासात
दिल्ली ते वडोदरा मधील पूर्वीच्या मार्गाने प्रवास करायचे झाल्यास 18 तासांपेक्षा अधिक कालावधी लागायचा . तो आता कमी होऊन फक्त 10 तासावर आला आहे. दिल्ली ते वडोदरा प्रवासासाठी पूर्वी 1082 km अंतर जावे लागायचे ते आता कमी होऊन फक्त 845 km इतकं झालं आहे. पुर्णपणे नवीन बनवण्यात आलेल्या दिल्ली ते वडोदरा एक्सप्रेसवे हाआठ लेनचा महामार्ग असून या महामार्गावर 120 km/hr चा ताशी वेगाने वाहने चालवता येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ व इंधनाचा खर्च वाचू शकेल .
एक्सप्रेसवेमुळे वाढणार शहरांची आर्थिक स्थिती- Delhi Mumbai Expressway
दिल्ली ते वडोदरा हा एक्सप्रेसवे देशातील हरियाणा (79km ) ,राजस्थान(373km) ,मध्यप्रदेश( 244 km ) व गुजरात राज्यातून जातो व गुजरात मध्ये वडोदरा शहराला जोडला जातो. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून या राज्यातील जयपूर, कोटा, चित्तोडगड, इंदूर, उज्जैन, भोपाळ आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांची असलेली कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल . त्यामुळे राज्यातील या शहरांमध्ये आर्थिक गतीविधीना मोठी चालना मिळेल.
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी निर्माण केला एक्सप्रेसवे
दिल्ली ते मुंबई या देशातील प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर व वेळ कमी करण्यासाठी तसेच प्रस्तापित महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी भारत सरकारने हा नवीन एक्सप्रेसवे बनवण्याचे ठरवले. दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे बनवण्यासाठी तब्बल 1 लाख करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा संपूर्ण महामार्ग 1346 km चा असून दिल्ली ते मुंबई हा प्रवास फक्त 12 तासात एक्सप्रेसवेच्या माध्यमातून पुर्ण करता येणार आहे. तसेच दिल्ली ते मुंबई या प्रवासाचे अंतर आधी पेक्षा 200 km ने कमी देखील होणार आहे. त्यामुळे ही सर्व नागरिकांसाठी आनंदाची बाब मानली जात आहे.