Gold Price Today : ग्राहकांना दिलासा! सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | पुढच्या महिन्यात दिवाळी हा सण आला आहे. दिवाळी सणाच्या काळामध्ये अनेक लग्न समारंभ उरकण्यात येतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जातो. या कारणामुळे सध्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ऐन मोक्यावर सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव उतरले आहेत. आज म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या किमती घटल्या आहेत. तर चांदीच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे.

Good Returns नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,600 रुपयांनी व्यवहार (Gold Price Today) करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,380 रूपये असा सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,890 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,790 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज MCX वेबसाईटवरील सोन्याचे भाव स्थिर आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 52,600 रुपये
मुंबई – 52,600 रुपये
नागपूर – 52,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 53,890 रूपये
मुंबई – 53,890 रूपये
नागपूर – 53,890 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आज चांदीच्या भावात (Gold Price Today) देखील घसरण झाली आहे. 10 ग्रॅम चांदी आज 710 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,100 रुपये विकली जात आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 71,000 रुपयांनी सुरू आहे. चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना देखील चांदी खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज प्लॅटिनम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो की, मंगळवारी प्लॅटिनमच्या किमतीत घसरण झाली आहे. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,32,000 असा सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने चांदी खरेदी करण्याबरोबर प्लॅटिनमच्या खरेदीसाठी योग्य आहे.