फायनल! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फाशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येईल. याबाबतचा नवीन डेथ वारंट जारी न्यायालयाने जारी केला आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना फासावर लटकावण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोर्टाच्या नियमानुसार सर्व दोषी आपापल्या वकिलांची भेट घेऊ शकतील.

निर्भया प्रकरणातील दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी दोषी पवन गुप्ता यांची दया याचिका फेटाळून लावली होती. उर्वरित तीन आरोपींची दया याचिका यापूर्वीच फेटाळून लावण्यात आली होती.

यानंतर तिहार जेल प्रशासनाने फाशीच्या नवीन तारखेसाठी पतियाळा हाऊस कोर्टकडे धाव घेतली असता आज कोर्टाने गुरुवारी सुनावणी केली आणि दोषींसाठी नवीन डेथ वॉरंट जारी केले. आता या चारही दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येईल.या प्रकरणाची सुनावणीत न्याधीशांनी आरोपी अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता यांना आपले वकील ए.पी. सिंग यांना भेटण्याची मुभा दिली.

.

Leave a Comment