Wednesday, March 29, 2023

निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; आता तरी फाशी होणार का?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली होती. ही याचिका राष्टपतींनी फेटाळून लावली आहे. दोषींच्या दया याचिकांमुळं आतापर्यंत ३ वेळा दोषींची फाशी लांबवणीवर पडली आहे. त्यामुळं आता अजूनही न्यायाच्या उंबरठ्यावरच असलेल्या निर्भयाला आता तरी न्याय मिळणार का हा सवाल वारंवार व्यवस्थेला विचारला जात आहे. मात्र, लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे दिलासादायक वृत्त मिळत आहे.

नायालयाने निर्भया हत्या प्रकरणातील चारही आरोपींना दोषी ठरवत मंगळवारी (३ मार्च) सकाळी ६ वाजता फाशी देण्याचा आदेश आधी दिला होता. मात्र, दोषी पवन गुप्ता याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केल्याने राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी देत चौघांच्या फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. दोषी पवन गुप्ताच्या दया याचिकेवर आज बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुपारी निर्णय दिला. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली असून, दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.