हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचार थांबला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जखमी जीटीबी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिस सर्व हिंसा प्रभावित भागावर दक्षतेने नजर ठेवून आहेत. दरम्यान आता भीषण हिंसाचाराच्या संबंधीच्या धक्कादायक कहाण्या आता समोर येत आहेत. हिंसाचाराच्या सुरुवातीपासून सलग ४ दिवसांपर्यंत पोलिसांना पीडितांचे तब्बल 13,200 कॉल आले होते.
23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात दिल्ली हिंसाचाराच्या आगीत जळत होती. 23 फेब्रुवारी रोजी पोलिस नियंत्रण कक्षाला हिंसाचारग्रस्त भागातून 700 कॉल करण्यात आले. 24 फेब्रुवारीला 3500 कॉल करण्यात आले, 25 फेब्रुवारीला सर्वात जास्त 7500 कॉल तर 26 फेब्रुवारी रोजी 1500 कॉल पोलिसांना करण्यात आले. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हिंसाचारग्रस्त भागातील दोन पोलिस ठाण्यांमधील कॉल रजिस्टरचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.