ओमिक्रॉननंतर आता डेल्मिक्रॉनची चर्चा; कोरोनाचा डबल व्हेरियंट किती धोकादायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहेत. आत्तापर्यंत आपण कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हॅरिएंट्स तसेच आता कोरोनाच्या ओमिक्रोन या व्हेरिएन्ट ने खळबळ उडवली आहे. त्यातच भर म्हणजे आता पुन्हा अजून एका नव्या व्हॅरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. डेल्मिक्रॉन असं या नव्या व्हॅरिएंटचं नाव आहे.

डेल्मिक्रॉन हा कोरोनाचा डबल व्हॅरिएंट असून, त्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रसार वाढत आहे.डेल्मिक्रॉन हे नाव डेल्टा आणि ओमिक्रॉन या नावांवरून दिलं गेलं आहे. हे दोन्ही व्हॅरिएंट भारतात सध्या अस्तित्वात आहेत. डेल्मिक्रॉनची लाट धोकादायक ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.

सध्या डेल्मिक्रॉनचा संसर्ग अमेरिका आणि युरोपात वाढताना दिसत आहे.अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देश डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंटचा सामना करत आहेत. या व्हॅरिएंटचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या वाढल्यानं डेल्मिक्रॉनचा संसर्ग निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, वास्तविक डेल्मिक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचं मिश्रण आहे.

Leave a Comment