कराड | कराड तालुक्यातील साजूर गावात मुलांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेत लावलेली झाडे बापलेकांनी तोडल्याची प्रकार केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे तोडण्यास अटकाव केली. तरीही दडपशाहीने बेकायदेशीरित्या 15 ते 20 फूट वाढलेली झाडे तोडल्याची तक्रार सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साजूर येथील श्री दत्त दूध डेअरी जवळ गावातील मुलांनी वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी झाडे लावलेली आहेत. दत्त डेअरीजवळ 4 वर्षापूर्वी लावलेली झाडे उभी आहेत. तेथील 15 ते 20 फूट लांबीची झाडे तोडण्यात आलेली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता रमेश परशुराम चव्हाण व वैभव रमेश चव्हाण यांनी झाडे तोडली आहेत.
सदरील सार्वजनिक जागेतील झाडे तोडल्या प्रकरणी साजूर येथील सागर चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, अविनाश चव्हाण, अोकांर कांबळे, सन्मय चव्हाण, आनंदराव चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सुमित चव्हाण, राज चव्हाण यांनी कारवाई करण्याचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.