‘जरंडेश्वर’चा गळीत हंगाम सुरू करा; जावलीतील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली प्रतिनिधी । जावली तालुक्याची अर्थवाहिनी व सहकाराचा केंद्र बिंदू असलेला प्रतापगड कारखाना सध्या बंद आहे. तसेच किसनवीर कारखानाही बंद असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांना आपला ऊस अन्य कारखान्यांना घालावा लागत आहे. चालू वर्षी तालुक्यातील बहुतांश ऊस जरंडेश्वर कारखान्याने उचलला आहे. दरम्यान, ‘जरंडेश्वर’ च्या विरोधात ईडीची कारवाई सुरू असली तरी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दयावा, अशी मागणी आज जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली.

यावेळी जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांना शेतकरी व कार्यकर्त्यांच्यावतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी जावली पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव पार्टे, माजी सभापती मोहनराव शिंदे , माजी उपसभापती तानाजी शिर्के, बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे , जेष्ठ नेते बबनदादा वारागडे, नारायण शिंगटे, वेण्णामाईचा अध्यक्ष सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख , प्रकाश कदम , हेमंत शिंदे , सोमनाथ कदम , धनंजय पोरे, चंद्रकांत गवळी आदी मान्यवर उपस्थीत होते.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जावली तालुक्यात दिड लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जात आहे. महु , हातगेघर धरणांचे पुर्णत्वाबरोबरच , बोंडारवाडी धरण झाल्यास ऊसाचे उत्पादन अधिक वाढू शकते. ” जरंडेश्वरचा ” गळीत हंगाम सुरू झालाच नाही तर जावली तालुक्यातील ऊस उत्यादक शेतकऱ्याबरोबरच जरंडेश्वरच्या ऊस उत्पादक , सभासदाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होवू शकते.कोरोना आजाराने अगोदरच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी शेतकऱ्यांच्या कष्टाचा व नुकसानीचा विचारविनीमय करून ‘जरंडेश्वर’ चा गळीत हंगाम सुरू करावा.

Leave a Comment