नागपूर प्रतिनिधी| लाची मध्ये महागड्या वस्तू आणि इतर ऐवजांची मागणी आपण ऐकली असेल मात्र नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकांच्या अधिकाऱ्यांनी चक्क २५ हजारांची लाच आणि सेक्ससाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात उघडकीस आला आहे.
कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का
स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला या पोलिसांनी कारवाहीची धमकी देऊन ३५ हजार आणि सेक्ससाठी तीन मुलींची मागणी केली. मात्र त्या महिलेने आपण ३५ हजार देण्यास असमर्थ असल्याचे सांगत पोलिसांना झुलवत ठेवले. त्याच दरम्यान या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकारची माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून पोलीस अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा कार्यक्रम आखला. एकाबाजूला हे सर्व घडत असताना पोलीस ३५ हजारांच्या लाचेच्या रकमेवरुन २५ हजाराच्या रकमेवर आले. संबंधित महिलेने देखील २५ हजार रोख आणि तीन मुलींची व्यवस्था केल्याचा बनाव केला. हे सर्व घडत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकऱ्यानी पोलीस अधिकाऱ्याला जागेवर रंगेहात पकडले.
शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा
दामोधर राजुरकर आणि हवालदार शितलाप्रसाद मिश्रा अशी या प्रकरणातील आरोपी पोलिसांची नावे आहेत. तसेच या प्रकारात नागपूर लाचलुचपत विभागाने भंडारा लाच लुचपत विभागाची मदत घेतली होती. दोन्हीही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती नागपूर लाचलुचपत विभागाच्या आयुक्त रश्मी नांदेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा खाकी वर्दी बदनाम झाली असून रक्षक भक्षक झाले आहेत का असा सवाल विचारला जात आहे. एक नासका आंबा संपूर्ण आडीला नासवतो असे म्हणतात. याच उक्ती प्रमाणे काही निर्लज्ज पोलीस अधिकारी संपूर्ण पोलीस खात्याला बदनाम करतात.