कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : पुरेसा पाऊस, सिंचन व्यवस्था असेल तरच पेरणी करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | शेतात पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शेतात सर्व पिकाच्या बियाण्यास बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक असून बियाण्याची उगवणक्षमता तपासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी निवडावे. सिंचन सुविधा नसल्यास किंवा वापसा नसल्यास पेरणी करू नये, अन्यथा पिकांवर विपरीत परिणाम होवू शकतो. तेव्हा आपले नुकसान होवू नये, यांची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आहवान जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.