बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 2 बड्या नेत्यांनी दिला पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि 2 संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. ज्याचा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बीड बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले असता शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पुढाकार घेऊन आपल्याकडे सत्ता खेचून आणली होती. त्यांच्यामुळेच शिवसेनेचा झेंडा बाजार समितीवर फडकला गेला होता. या निवडणुकीत उपसभापती श्यामसुंदर पडूळे,धनंजय गुंदेकर, दिपक काळे निवडून आले होते.

परंतु, आता जिल्हा प्रमुख निवडल्याने शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याचाच एक भाग म्हणून उपसभापती आणि दोन संचालकांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या हातून बीड बाजार समिती जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.