स्ट्रीटलाईट चालू करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वीज वितरणकडून केराची टोपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठ दिवसापूर्वी सरपंच परिषद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन विविध मागण्यांचे केल्या होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम गावातील स्ट्रीट लाईटची चालू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला वीज वितरण कंपनीकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. स्ट्रीट लाईट जोडणे संदर्भात कोणताही आदेश आमच्यापर्यंत पोहोचला नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना परिस्थितीमुळे अनेक ग्रामपंचायतींचे कर थकीत आहेत. लोकांनी कोरोनासारख्या महामार्गामुळे पाणीकर, वीजकर, आरोग्य कर, पाणीपट्टी-घरपट्टी असे कर ग्रामपंचायतीला भरलेले नाहीत. त्याचबरोबर गेल्या आठ ते पंधरा दिवसात अतिवृष्टीचा जोरदार तडाका लोकांना सहन करावा लागला आहे. या सर्व गोष्टींमुळे नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त लोकांनी ग्रामपंचायतीचे कोणतेही कर भरलेले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत गावातील स्ट्रीट लाई चे लाईट बिल भरू शकत नाही. अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. या गावातील स्ट्रीट लाईटचे लाईट बिल यापूर्वी जिल्हा परिषद भरत होती.

गेल्या पंधरा दिवसात पावसाचा जोर राज्यात मोठा आहे अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती असून सातारा जिल्ह्यातील पाटण वाई जा विभागात अनेक ठिकाणी दरडी भुस्कलन होण्याच्या घटना घडलेले आहेत अनेक गावे पाण्याने वेढली गेली होती अशा परिस्थितीत स्ट्रीट लाईट नसल्याने गावे अंधारात होती. सध्या हीच परिस्थिती असताना स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी लोकांच्यातून होत आहे.

You might also like