नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,
एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलंय तर विहिरींनी अक्षरशा तळ गाठलाय. याच विहिरीतून जीवघेणी कसरत करत महिलाना पाणी भाराव लागतंय.
श्वास रोखून धरणारी ही दृश्य तुमच्या काळजाचा ठोका निश्चितच चुकावातील.. थरकाप उडविणारी ही दृश आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्म्बकेश्वर तालुक्यातील बार्ड्याचीवाडी या गावातील… साडेचारशे पाचशे लोकवस्तीच्या या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण आहे. एकच विहिरी तीही कोरडी पडत चाललेली. दोर टाकूनही पाणी येत नसल्यान गावातील कुठल्या न कुठल्या एका महिलेला ५० फुट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागते. लहान पोर सोर गुर ढोर घेऊन अक्खा गाव इथ सकाळ संध्याकाळ जमा होत.
रोज एक एक थेंब पाण्यासाठी जीवघेणी कसरत सुरु होते. पाय लटालटा कापतात, भीती वाटते पण या भीतीवर मात केली नाही तर पिण्यासाठी पाणी मिळणार कस…? हा एकच प्रश्न उभा राहतो मग कधी महिला तर कधी तरुणी स्वताच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण गावाला पाणी मिळाव या एकाच अपेक्षेन दोराला दोराला पकडून विहिरीत उतरतात.