नवी दिल्ली । केंद्राने आज सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च रोजी दिलेल्या एका आदेशात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल करण्याची शेवटची मुदत निश्चित केली होती. आदेशानुसार, 20 मार्चपूर्वी झालेल्या मृत्यूंसाठी 60 दिवसांच्या आत क्लेम दाखल करावे लागतील. त्याचबरोबर भविष्यातील कोणत्याही मृत्यूसाठी क्लेम दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात चार आठवड्यांची मुदत पुरेशी नसल्याचे म्हटले होते. कोविड-19 मुळे जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूवर पेमेंटचा क्लेम करण्यासाठी केंद्राने वेळ निश्चित केली आहे. मृतांचे नातेवाईक दु:खात आहेत, त्यामुळे एवढा वेळ पुरेसा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
4 आठवडे पुरेसे नाहीत
न्यायमूर्ती एमआर शाह आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सूचित केले की,” अशा सर्व व्यक्तींना 60 दिवसांचा कालावधी दिला जाईल जे भरपाईसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भावी उमेदवारांना 90 दिवसांचा अवधी दिला जाईल.”
न्यायालयाने म्हटले, “हा (चार आठवडे) योग्य कालावधी असू शकत नाही, कारण संबंधित कुटुंबाला धक्का बसलेला असू शकतो. चार आठवडे कदाचित चांगला काळ नाही. जर मृत्यू झाला, तर कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी आणि पुन्हा क्लेम दाखल करण्यासाठी वेळ लागेल.”
खोटे क्लेम करणाऱ्यांना शिक्षा होईल
आदेशानुसार, जर कोणी खोटा क्लेम केला तर त्याला शिक्षा होईल. 5 टक्के दावेदारांची यादृच्छिक छाननी केली जाईल. क्लेम खोटा असल्याचे आढळून आल्यास त्याला शिक्षा होईल. बनावट क्लेमचा धोका कमी करण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची एक्स-ग्रेशिया मिळवून देण्याच्या खोट्या क्लेमबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याचा गैरवापर होऊ शकतो, याची कल्पनाही केली नव्हती, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की नैतिकतेचा दर्जा इतका खाली जाऊ शकत नाही असे वाटते.