कृष्णा खो-यातील मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यासाठी कटीबध्द; अशोक चव्हाणांची ग्वाही

Ashok Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृष्णा खो-यातील मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे अशी ग्वाही काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. भारत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिहासनाधिष्ठ पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते सर्व प्रयत्ने मी करीत आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांच्या पाण्याचा प्रशन सोडवण्यासाठी राज्यशासन कटीबध्द आहे.तसेच मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णाखो-यातील 24 टीएमसी पाणी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यास मिळावे यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदार आणि खासदारांचे एकमत आहे या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील नेतेमंडळींचा विकास कामाला पाठपुरावा असतो मात्र लढवय्याची भूमिका महत्वाची आहे, ती सर्वांच्या प्रयत्नातुन व्हावी असे अशोक चव्हाण म्हणाले

दरम्यान, मराठवाड्याच्या हक्काचा पाणीप्रश्न, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अशोकराव चव्हाण यांनी पालकत्वाची जबाबदारी स्विकारावी, त्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांचे सहकार्य असेल. अशी भावना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर, आमदार काळे यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे खासदार संजय पाटील होते, तर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री.विक्रम काळे, सतीश चव्हाण,अमर राजूरकर, ज्ञानराज चौगुले, संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार मधुकर चव्हाण,भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजी मोरे उपाध्यक्ष अश्लेश मोरे आणि गुरुबाबा महाराज औसेकर उपस्थित होते.