कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड । एलबीटीवरून अभ्यास न करता कॅलल्युलेशन समजत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलत आहेत. याकरिता अजित दादांना दोष देणार नाही. केंद्राने राज्याचे मार्चअखेरपर्यंतचे जीएसटीचे सर्व पैसे दिलेले आहेत तरीही खोटे बोल पण रेटून बोल अशी पध्दत महाविकास आघाडीची आहे. मार्चनंतर जीएसटीचे संकलनच झाले नाही. तरीही केंद्राने राज्यांना मदतीची भूमिका घेतली असून केंद्राने पैसे अडकवल्याचा चुकीचा आरोप होत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित दौर्याप्रसंगी त्यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पिटला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.जयकुमार गोरे, भाजपचे शेखर चरेगावकर, भाजप सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
ना. फडणवीस म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल अशी कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची पध्दत आहे. मागच्या वर्षीचे संपूर्ण देण मार्चपर्यंतच १९ हजार ५०० कोटी रूपये केंद्र सरकारने पूर्ण केले आहे. आताची मागणी ही मार्चनंतरचे देणे मागत आहे. मात्र राज्य आणि केंद्राला जीएसटी आलेले नाहीत. तरीही राज्यांची अपेक्षा आहे. रेग्युलर राज्याची कोणतीही थकबाकी केंद्राकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकार सांगू शकते की आमच्याकडे पैसे नाहीत, तर आम्ही देणार नाही. परंतु तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अडचणीचा काळ असल्याने राज्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन योजना सांगितल्या आहेत त्यामध्ये राज्याने कर्ज घ्यावे किंवा आरबीयाने काही योजना तयार करावी. त्याला केंद्र मदत करणार आहे. त्यामुळे पैसे कुठेही केंद्राने ठेवलेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’