हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत पोलीस भरतीबाबत चर्चा झाल्याचे फडणवीसानी म्हंटल. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मोठी संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन दोन वर्षांतील पोलीस भरती लवकरच केली जाणार आहे. साधारणपणे 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. आठ हजार पदांसाठी आधीच जाहिरात निघाली आहे. आता लवकरच 12 हजार पदांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. या भरतीमुळे पोलीस दलाल निश्चित फायदा होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/U2J2qC4PY9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2022
यावेळी फडणवीसांनी वेदांत- फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पासाठी कंपनीला जागाच दाखवली नव्हती. तसेच एकही कॅबिनेटची बैठक देखील घेण्यात आली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळात वेदांत प्रकल्पाबाबत काहीच झालं नाही, असा आरोप फडणवीसांनी केलाय.